Zelenskyy : झेलेन्स्की म्हणाले- अमेरिका व रशियासोबत त्रिपक्षीय चर्चेसाठी तयार; पण जमीन सोडणार नाही
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेच्या त्रिपक्षीय चर्चा प्रस्तावावर सहमत झाले आहेत. त्यांनी शनिवारी सांगितले की, जर चर्चेतून कैद्यांची अदलाबदल होऊ शकते किंवा राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीचा मार्ग मोकळा होतो, तर युक्रेन या प्रस्तावाला पाठिंबा देईल.