Trump : ट्रम्प यांचा जपानवर अमेरिकी तांदूळ खरेदीसाठी दबाव; संतप्त जपानी शिष्टमंडळाने दौरा रद्द केला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जपानवर अमेरिकन तांदळासाठी बाजारपेठ खुली करण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे, जपानचे मुख्य वाटाघाटीकार रयोसेई अकाजावा यांनी त्यांचा अमेरिका दौरा रद्द केला आहे.निक्केई एशियाच्या वृत्तानुसार, अकाजावा २८ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसीला भेट देणार होते. परंतु ट्रम्प यांनी अमेरिकन तांदूळ खरेदी करण्यासाठी दबाव आणल्यानंतर त्यांना हा दौरा रद्द करावा लागला.