US-Iran Deal : द फोकस एक्सप्लेनर: US-इराण डीलने बदलणार जगाचे चित्र? होर्मुझ खुला, तेल स्वस्त, निर्बंध हटणार; जाणून घ्या 14 अटी
अमेरिका आणि इराण यांच्यातील वैर जवळपास चार दशकांहून अधिक काळ चालत आले आहे. अणुकार्यक्रम, आर्थिक निर्बंध, आखाती प्रदेशातील संघर्ष, इस्रायल-इराण तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील वर्चस्व यामुळे दोन्ही देश अनेकदा युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे जगाचे लक्ष एका संभाव्य ऐतिहासिक कराराकडे लागले आहे.