S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?
अमेरिकेतील १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरताच, विरोधकांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या घटनेवर परराष्ट्रमंत्र्यांकडे उत्तर देण्याची मागणी केली, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्तर दिले. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की अमेरिकेची ही कृती नवीन नव्हती, त्यानंतर त्यांनी १५ वर्षांचा डेटा शेअर केला.