US bans ; अमेरिकेची भारतातील 4 तेल निर्यात कंपन्यांवर बंदी, इराणसोबत व्यवसाय केल्याने कारवाई
इराणी पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्री आणि वाहतुकीत मध्यस्थी केल्याबद्दल अमेरिकन सरकारने भारतातील चार कंपन्यांवर निर्बंध लादले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या वित्त विभागाने सोमवारी एक प्रेस रिलीज जारी करून याबद्दल माहिती दिली.