FASTag : फास्टॅग नसेल तर दुप्पट रोख शुल्क, UPI पेमेंटसाठी फक्त 1.25 पट रक्कम; नियम 15 नोव्हेंबरपासून लागू
सरकारने फास्टॅगसाठीचे नियम बदलले आहेत. जर एखाद्या वाहनाने वैध आणि सक्रिय फास्टॅगशिवाय टोल प्लाझा ओलांडला आणि रोख रक्कम भरली तर त्याच्याकडून दुप्पट टोल शुल्क आकारले जाईल. तथापि, जर तुम्ही UPI वापरून पैसे भरले तर तुम्हाला त्या वाहन श्रेणीसाठी लागू असलेल्या शुल्काच्या फक्त १.२५ पट शुल्क भरावे लागेल. हा नवीन नियम १५ नोव्हेंबरपासून लागू होईल.