Bareilly : यूपीच्या बरेलीत शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ; आंदोलनाची परवानगी रद्द; संतप्त जमावाची दगडफेक
शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये “आय लव्ह मोहंमद” वादावरून तीन ठिकाणी गदारोळ झाला. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मौलाना तौकीर रझा यांनी शहरातील इस्लामिया मैदानावर मुस्लिमांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते, परंतु प्रशासनाने परवानगी नाकारली. शुक्रवारच्या नमाजानंतर जमाव रस्त्यावर उतरला आणि जबरदस्तीने मैदानात प्रवेश करण्याचा आग्रह धरला.