Pankaj Chaudhary : पंकज चौधरी यूपी भाजपचे नवे अध्यक्ष; योगी प्रस्तावक बनले, इतरांनी नामांकन केले नाही
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी हे यूपी भाजपचे नवे अध्यक्ष असतील. शनिवारी त्यांनी लखनौमधील भाजप कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. चौधरी यांच्याशिवाय इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी-अमित शहा यांचे निकटवर्तीय चौधरी यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड निश्चित आहे.