Maharashtra : ऐन दिवाळीत पावसाचा तडाखा; कोकणासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अलर्ट
ऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये पावसाने आज दुपारी अचानक हजेरी लावली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.