Delhi HC : HCचा कुलदीप सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार; उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या न्यायिक कोठडीतील मृत्यू प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी बलात्कारी कुलदीप सिंह सेंगरच्या शिक्षेच्या निलंबनाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला 10 वर्षांच्या कठोर कारावासाची आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.