United Nations : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांचे आयोजक, गुन्हेगार आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.