UNSC President : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला पाकिस्तान, या दोन मुद्द्यांवर काम करणार
पाकिस्तानला मंगळवारपासून जुलै २०२५ महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळाले आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जानेवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या परिषदेच्या तात्पुरत्या सदस्य म्हणून पाकिस्तानच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा एक भाग आहे. पाकिस्तानला UNSC चा तात्पुरता सदस्य होण्यासाठी १९३ पैकी १८२ मते मिळाली. परिषदेचे अध्यक्षपद दरमहा त्याच्या १५ सदस्य देशांमध्ये वर्णक्रमानुसार फिरते आणि या क्रमाने पाकिस्तानला UNSC चे अध्यक्षपद मिळाले आहे.