Union Home Ministry : केंद्रीय गृह मंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय: मराठीतून आलेल्या पत्रांना आता मराठीतूनच उत्तर
हिंदी भाषा वापरासंदर्भात देशभरात विशेषतः महाराष्ट्रात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने भाषिक सन्मान आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता गृह मंत्रालयाला मराठीतून प्राप्त झालेल्या पत्रांना उत्तर देखील मराठीतूनच दिले जाणार आहे. तसंच, तामिळ किंवा अन्य प्रादेशिक भाषांतील पत्रांना संबंधित भाषेतूनच उत्तर दिले जाईल.