UNICEF : आशियामध्ये बांगलादेशात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक – युनिसेफ
बांगलादेश बालविवाह, लिंग असमानता, हिंसाचार आणि मुलींसाठी मर्यादित संधींच्या उच्च दरांशी झुंजत आहे. अलिकडच्या एका जागतिक अहवालात हे उघड झाले आहे. या अहवालाचे शीर्षक आहे, गर्ल्स गोल्स: व्हाट हैव चेंजेज फॉर गर्ल्स? एडोलसेंट गर्ल्स राइट्स इन 30 इयर्स. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त युनिसेफ, यूएन वुमन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला.