UNESCO’s : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या गडकिल्ल्यांचा समावेश
जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत घेण्यात आलेल्या एका उल्लेखनीय निर्णयात, 2024-25 साठी भारताचे अधिकृत नामांकन म्हणून, ‘भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले ‘ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही मान्यता मिळवणारी भारताची ही 44 वी स्थळे बनली आहेत. ही जागतिक प्रशंसा भारताच्या चिरंतन सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करते ज्यामधून त्याच्या स्थापत्य प्रतिभेच्या, प्रादेशिक अस्मितेच्या आणि ऐतिहासिक सातत्यतेच्या विविध परंपरा प्रदर्शित होतात.