Girish Mahajan : महाजन यांची घोषणा; अधिवेशनानंतर शिक्षकांच्या खात्यात 20% वाढीव पगार, आंदोलनाला यश
शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.