Israel : गाझा-हमास मुद्द्यावरून इस्रायलची फ्रान्स-ब्रिटनवर टीका; UN मध्ये कतारवर हल्ल्याचे केले समर्थन
इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनन यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत कतारमधील हमास नेत्यांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा बचाव केला आणि फ्रान्स आणि ब्रिटनवर टीका केली. डॅनन म्हणाले की, २०१४ ते २०२२ पर्यंत फ्रान्सने माली, चाड, बुर्किना फासो आणि मॉरिटानियामध्ये दहशतवाद्यांवर हल्ले केले. ब्रिटनने इराक आणि सीरियामध्ये आयसिसवर हवाई हल्ले केले.