UN Security Council : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुन्हा बसला झटका
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याला धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून दहशतवादाशी संबंधित चार समित्यांच्या नेतृत्वाची पाकिस्तानची मागणी परिषदेच्या इतर सदस्यांनी फेटाळली आहे.