UN General : संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर
संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) अध्यक्ष फिलेमोन यांग ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान भारताच्या दौऱ्यावर असतील. भारत सरकारच्या निमंत्रणावरून ते येथे येत आहेत. त्यांच्या भारत भेटीमुळे संयुक्त राष्ट्र आणि भारत यांच्यातील सहकार्य बळकट होईल आणि गंभीर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर जागतिक प्रयत्नांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.