Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक
सोमवारी रात्री उशिरा सौदी अरेबियात झालेल्या एका रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या त्यांच्या बसची डिझेल टँकरशी टक्कर झाली आणि त्यात आग लागली. मृतांमध्ये १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले यांचा समावेश आहे. वृत्तानुसार, या अपघातात फक्त बस चालक बचावला.