Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोटाचा 3 अँगलमधून तपास; कारमध्ये बसलेल्या डॉ. उमरने 3 तास काय केले?
१० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:५२ वाजता दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, प्राथमिक पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि एक डेटोनेटर वापरण्यात आला होता. पोलिस आता या स्फोटाचा तीन कोनातून तपास करत आहेत.