Eknath Shinde : मोदींवर आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; चर्चेत राहण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न, एकनाथ शिंदेंचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एपस्टीन फाईल्स’बाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. “पंतप्रधानांबद्दल काहीही बोलून चर्चेत राहण्याचा हा पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न असून, त्यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी चव्हाणांवर तोफ डागली.