Ukraine : अमेरिकेने युक्रेनला सर्व लष्करी मदत रोखली; ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर 3 दिवसांनी घोषणा
व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेच्या तीन दिवसांनंतर, अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, हा आदेश तात्काळ लागू होईल. अमेरिकेकडून अद्याप युक्रेनपर्यंत न पोहोचलेली मदत देखील रोखण्यात आली आहे. यामध्ये पोलंडमध्ये पोहोचलेल्या वस्तूंचाही समावेश आहे.