Ukraine war : युक्रेन युद्धावर अमेरिकेची माघार; संयुक्त राष्ट्रांत रशियन हल्ल्याच्या निषेधास नकार, इस्रायलचाही पाठिंबा
मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत युक्रेनियन ठरावाविरुद्ध रशियाच्या समर्थनार्थ अमेरिकेने मतदान केले. रशियासोबतच्या युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल युक्रेनने संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव मांडला होता. या ठरावात रशियन हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि युक्रेनमधून रशियन सैन्य तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.