Donald Trump : पाकिस्तानवंशीय लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर ट्रम्प यांची टीका, म्हणाले- त्यांनी खूप वाईट काम केले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. स्कॉटलंडमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी खान यांना एक वाईट व्यक्ती म्हटले आणि त्यांच्या कामावर टीका केली.