UIDAI : शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्याची योजना; UIDAI 7 कोटी मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणार
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. देशभरातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 7 कोटी मुलांचा बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो) आधारमध्ये अपडेट केला जाईल.