Udhayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- संस्कृत मृत भाषा, तमिळची चिंता, मग हिंदी का लादत आहात? भाजपने म्हटले- तमिळमध्येही अनेक संस्कृत शब्द
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी संस्कृत भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. द्रमुक नेत्याने शुक्रवारी केंद्र सरकारवर टीका केली आणि म्हटले की, तमिळ विकासासाठी फक्त १५० कोटी रुपये दिले जातात, तर संस्कृत, जी एक मृतप्राय भाषा आहे, तिला २,४०० कोटी रुपये मिळतात.