Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून हिरवी चादर ओढली, त्यांचा रॅडिकल इस्लामिक विचारांना बळ देण्याचा प्रयत्न, अमित साटमांचे आरोप
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्यावर भ्रष्टाचार, हिंदुत्वाचा त्याग आणि मुस्लिम तुष्टीकरणाचे गंभीर आरोप केले आहेत. रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट प्रयत्नांना बळकट देण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असल्याचे अमित साटम म्हणालेत. तसेच 1997 ते 2022 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला. तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्यामागे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रशासनाचा थेट हात आहे, असा दावा अमित साटम यांनी केला.