Uddhav Thackeray : सोनम वांगचुक देशद्रोही तर नवाज शरीफ यांचा केक खाणाऱ्यांना काय म्हणायचे?
लेह लडाखसाठी लढणारे सोनम वांगचूक हे पाकिस्तान जाऊन आले म्हणून देशद्रोही ठरत असतील तर गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाऊन आलेल्या नरेंद्र मोदी यांना काय म्हणायचे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे.