Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा भगवा हिरवा केला; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचे कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.