Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांचा आवाज वापरून अभिनेता आमिर खानची फसवणूक; शाहूपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आवाजाची नक्कल करून बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अली अमानत शेख असे असून, तो पुण्याचा रहिवासी आहे.