Udayanidhi : सनातनविरोधी वक्तव्य, उदयनिधींना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट; परवानगीशिवाय FIR नाही; सुप्रीम कोर्टाचा आदेश
सनातन धर्मविरोधी टिप्पणी प्रकरणात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरुद्ध त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही नवीन एफआयआर दाखल केला जाणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. याशिवाय, सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने उदयनिधी यांना सुनावणीत उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा अंतरिम आदेशही वाढवला.