UAE President : UAE अध्यक्ष पाकिस्तानात पोहोचले; PMसोबत द्विपक्षीय चर्चा, व्यापार-ऊर्जेवर कराराची शक्यता
संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान शुक्रवारी पाकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर इस्लामाबादला पोहोचले आहेत.या वर्षातील त्यांचा हा पाकिस्तानचा दुसरा दौरा आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये ते रहीम यार खान येथे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भेटले होते. तथापि, अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिला अधिकृत पाकिस्तान दौरा आहे.