Vijay Rally : तमिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 36 ठार, मृतांमध्ये 8 मुले, 16 महिला
शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहे, असे तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम.ए. सुब्रमण्यम यांनी सांगितले. या अपघातात ५८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.