Turkish company Celebi : बहिष्कारानंतर सरकारचाही दणका; तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने तुर्कीविरोधात मोठे पाऊल उचलत सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे.