Turkey : तुर्कीच्या इस्तांबूलमध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप; मरमारा समुद्रात केंद्रबिंदू, 1 तासात बसले 3 मोठे धक्के
आज तुर्कीमधील इस्तांबूल येथे ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र इस्तंबूलजवळील मरमारा समुद्रात होते. तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने बुधवारी सांगितले की, भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.