Trump’s : राष्ट्रीय हितासाठी सर्व उपाय करणार, भारतावर २५% टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर केंद्र सरकारची ठाम भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारताच्या काही महत्त्वाच्या निर्यात वस्तूंवर २५% आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला आहे. यावर भारत सरकारने अधिकृत प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं आहे की, देशाच्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.