Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
अमेरिकेत पुन्हा एकदा ‘ट्रम्प युग’ परतले आहे. रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता अमेरिकन संसद कॅपिटल हिल येथे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शपथ दिली. यासह ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.