Trump : व्हेनेझुएलाहून तेल खरेदी करणाऱ्यांवर ट्रम्प 25% टॅरिफ लादणार; भारतही अशाच देशांपैकी, रिलायन्स खरेदी करते 90% तेल
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला येथून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर २५% अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क २ एप्रिलपासून लागू होईल. ट्रम्प यांच्या मते, याचा उद्देश व्हेनेझुएलाला शिक्षा करणे आहे.