Trump-Zelensky : द फोकस एक्सप्लेनर : ट्रंप आणि झेलेन्स्की वादामुळे रशिया खुश, NATO चिंतेत… युक्रेनसमोर आता कोणते पर्याय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये मोठा वाद झाला. अमेरिकन मीडियानुसार, आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही पाहुण्यावर इतक्या आक्रमक पद्धतीने कोणतेही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी वागले नव्हते, जितके ट्रम्प झेलेन्स्की यांच्यावर भडकले. त्यांनी युक्रेनला मदत थांबवण्याची धमकीही दिली. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की, झेलेन्स्की आता काय करतील?