Trump warns : चीनचा अमेरिकेवर 34 टक्के कर; ट्रम्प यांचा इशारा-महागात पडेल; चीनने US कंपन्यांना सेमीकंडक्टर निर्यात रोखली
जागतिक व्यापार युद्ध आणखी वाढले. चीनने अमेरिकन आयातीवर ३४ टक्के कराची घोषणा केली. चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, नवीन आयात कर १० एप्रिलपासून लागू होईल. चीनची ही प्रत्युत्तरादाखलची कारवाई अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीनवर लावलेल्या ३४ टक्के आयात करावरील प्रतिक्रिया आहे. चीन म्हणाले, कराच्या नावाखाली अमेरिका दादागिरी करत आहे. ते सहन केले जाणार नाही.