Trump : ट्रम्प यांनी वर्षभरात ₹18 हजार कोटींचा निधी गोळा केला; बदल्यात कोट्यवधींचे फायदे दिले
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या टीमने मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या तपासणीत समोर आले आहे की, निवडणुकीनंतर ट्रम्प आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी विविध निधी आणि योजनांसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर (18 हजार कोटी रुपये) जमा केले. ही रक्कम त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी गोळा केलेल्या निधीपेक्षाही जास्त आहे.