Tripura border : त्रिपुरा सीमेवर बीएसएफने १५ बांगलादेशींना पकडले, मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न
बांगलादेशातून भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना सुरूच आहेत. आता सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच बीएसएफने त्रिपुरामध्ये बांगलादेशातील १५ नागरिकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे, बीएसएफने दोन वेगवेगळ्या कारवाईत सात मुलांसह १५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यासोबतच तीन भारतीय दलालांनाही अटक करण्यात आली आहे.