PM Modi : INS विक्रांतवर पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी, म्हणाले- ऑपरेशन सिंदूरवेळी तिन्ही दलांनी पाकिस्तानची झोप उडवली
तिन्ही सशस्त्र दलांमधील असामान्य समन्वय तसेच नौदलाने निर्माण केलेली भीती, हवाई दलाचे असाधारण कौशल्य व लष्कराच्या शौर्यामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला काही क्षणांतच गुडघे टेकावे लागले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले. आयएनएस विक्रांतने पाकिस्तानची झोप कशी उडवली होती हेही आपण पाहिल्याचे मोदींनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने नवीन ध्वज स्वीकारला याचाही उल्लेख मोदींनी भाषणातून केला. गोव्याच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली. त्या वेळी मोदी म्हणाले की, ‘स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचे एक शक्तिशाली प्रतीक आहे.’