Maharashtra : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्गाला मंजुरी, 3 तासांऐवजी दीड तासात होणार प्रवास
मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर-गोंदिया नियंत्रित प्रवेश द्रुतगती मार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या तीन तासांहून अधिक वेळेवरून सुमारे ९० मिनिटांपर्यंत कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे कार्यान्वित केला जाईल आणि मंत्रिमंडळाने भूसंपादनासाठी ३,१६२ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. १६२.५ किमी लांबीच्या या मार्गाचा नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ११५ गावांना फायदा होईल. यामुळे आदिवासीबहुल आणि मागासलेल्या भागांची नागपूर आणि मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढेल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.