Tragedy in Amalner : खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी काढण्याच्या नादात ३ निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.