Election Commission : विरोधकांचा बोगस मतदानाचा मुद्दा; दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी टूल तयार, राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार करण्यात आले असल्याचे निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. तसेच या मतदारांशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.