Tirupati Temple : तिरुपतीस 12.43 लाख भाविकांकडून केस अर्पण:176 कोटींची विक्रमी कमाई होणार; छोटे 135, प्रीमियम केसांची 20 हजार रुपये किलोने विक्री
भगवान व्यंकटेश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात येणारे केस आता तिरुमला मंदिरासाठी अक्षरशः ‘काळे सोने’ ठरत आहेत. श्रद्धेपोटी केले जाणारे केशदान मंदिराच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत बनले असून यंदा या माध्यमातून विक्रमी कमाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे २०२६ महिन्यात तिरुमलामध्ये केशदानाचा नवा उच्चांक नोंदवला गेला असून अवघ्या २७ दिवसांत १२ लाख ४३ हजारांहून अधिक भाविकांनी आपले केस देवाला अर्पण केले आहेत.