Supreme Court : मल्टीप्लेक्समधील महागाईवर सुप्रीम कोर्टाची नाराजी, म्हटले- 100 रुपयांना पाण्याची बाटली, ७०० रुपयांना कॉफी विकता!
सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच म्हटले आहे की जर मल्टीप्लेक्सनी त्यांच्या तिकिटांचे दर कमी केले नाहीत तर सिनेमा हॉल रिकामे राहतील. न्यायालयाने नमूद केले की सिनेमाची लोकप्रियता कमी होत आहे आणि तिकिटांचे दर सामान्य लोकांना परवडणारे होत नाहीत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली.