Maharashtra Govt : त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR; फेरविचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती
त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ‘पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या जीआरमध्ये उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच नवी समिती 3 महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल.